Home स्टोरी पळसंब जयंती देवी मंदिर येथे मोफत वृत्तपत्र वाचण्यास उपलब्ध…!

पळसंब जयंती देवी मंदिर येथे मोफत वृत्तपत्र वाचण्यास उपलब्ध…!

189

मसुरे प्रतिनिधी: श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब ( रजि) यांच्या पुढाकाराने महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर श्री.जयंती देवी मंदिर येथे प्रहार व सिधुदुर्ग टाईम्स हे दोन वृत्तपत्र वाचकांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आली. वृत्तपत्रासाठी एक वर्षाची देणगी श्री प्रमोद सावंत व श्रीकांत सावंत याच्या कडून देण्यात आली असून वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे . उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी देवस्थान मानकरी श्रीप्रकाश कापडी, श्री राजन पुजारे, सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद सावंत, कार्यकारी मंडळाचे सभासद अमित पुजारे ग्रामस्थ नरहरी सावंत उपस्थित होते .