Home स्टोरी पळसंब गावातबीएसएनएल सेवेचा बोजावरा!

पळसंब गावातबीएसएनएल सेवेचा बोजावरा!

222

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): पळसंब गावातील BSNL ची सेवा सतत नादुरुस्त असल्या बाबत माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनीं नाराजी व्यक्त केली आहे. टॉवरची जुनी झालेली यंत्रणा बदलून नविन आधुनिक यंत्रणा बसवून टॉवर पूर्ववत करणे आवश्यक आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर यांचा त्रास अधिक जाणवत आहे. पळसंब गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालय ,रास्त भावाचे धान्य दुकान , ग्रामपंचायत असो किंवा सर्व सामान्य नागरिक सर्वजण याबी एस एन एल च्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहेत. पुढच्या आठ दिवसांत बी एस एन एल च्या सेवेत सुधारणा न झाल्यास उपसरपंच अविराज परब आणि माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी मालवण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.