मसुरे प्रतिनिधी: मूळ मुंबई येथे राहणारी पळसंब गावठाणची सुकन्या श्रुती संदिप परब हिने राज्य स्तरीय स्पर्धेत ‘किक बाॅक्सिंग फेडरेशन कप ‘ ५० किलो ग्रॅम वजनीय व १८ वर्षे वयोगटीय मुलींच्या संघातुन सुवर्णपदक मिळवले आहे. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बारामती येथे आयोजित ‘किकबाक्सिंग फेडरेशन कप’ स्पर्धेत राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कठीण आणि सर्वोत्कृष्ट समजणार्या खेळाच्या स्पर्धेत सिंधुदुर्गाची मान अभिमानाने उंचावणार्या पळसंब गावची कन्या व महाराष्ट्र मुंबई येथील कु. श्रुती संदिप परब हिने सुवर्णपदक पटकावले.तिच्या यशा बद्दल पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, जेष्ठ अभिनेते गिरीधर पुजारे यांनी अभिनंदन केले आहे. श्रुती हिने या यशाचे श्रेय तिचे प्रशिक्षक ओमकार शिवणकर आणि टिम यांना दिले आहे.
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब च्या आजिव सभासद सौ . शितल परब यांच्या त्या कन्या होत.श्रुती परब पळसंब येथे आल्यावर गावाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात येणार आहे असे मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत यांनी सांगितले.