मुंबई प्रतिनिधी : (पेडणेकर): समाजाने माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी समाजासाठी काय केलं हे महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण सांगतो की मी परब मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे किंवा सदस्य आहे तेव्हा मनाला एक समाधान मिळतं. आपल्या समाजाला प्रत्येकाने पुढे आणणे आज खरी गरज आहे. आज समाजातून भविष्यात आयपीएस सारखे अधिकारी निर्माण होतील तेव्हा तो समाजाचा खरा अभिमान ठरेल असे मत माजी मंत्री आणि परब मराठा समाजाचे अध्यक्ष अनिल परब यांनी शिवाजी मंदिर दादर येथे बोलताना व्यक्त केले. परब मराठा समाज मुंबई यांच्या हिरक महोत्सवी वर्ष शुभारंभ तसेच विविध क्षेत्रातील गुणवान विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि परब बांधवांचा कौटुंबिक सोहळा समारंभ मुंबई दादर येथील शिवाजी नाट्यमंदिर येथे विविध उपक्रमाने नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजाचे अध्यक्ष एडवोकेट अनिल परब यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त इन्कम टॅक्स चीफ कमिशनर श्री अरुण पवार, परब मराठा समाजाचे उपाध्यक्ष उद्योजक डॉ.दीपक परब, जनरल सेक्रेटरी श्री जी एस परब, महिला संघटक श्रीमती प्रतीक्षा परब, सिंधुदुर्ग संघटक श्री विनायक परब, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष हरीश परब, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, राष्ट्रवादी मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री रमेश परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक श्री बाबा परब आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये परब मराठा समाजाच्या वतीने देण्यात येणारा पहिला तेजस्विनी पुरस्कार या समाजाच्या श्रीमती प्रतीक्षा प्रमोद परब यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल श्रीफळ सन्मानचिन्ह मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच कला क्रीडा, शिक्षण, सामाजिक अशा विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी केलेल्या मंगलाताई परब, दिशा परब, हेमांगी परब, मानसी परब, आबा राजन परब, निशांत परब यांचा सुद्धा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे इन्कम टॅक्स चीफ कमिशनर निवृत्त श्री अरुण पवार यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी अरुण पवार यांचाही विशेष गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी द आर्ट स्टुडिओ डोंबिवली निर्मित मराठमोळ्या महिलांचा बहारदार कार्यक्रमही सादर करण्यात आला. याप्रसंगी जगदीश परब, शैलेंद्र परब, आत्माराम परब, संतोष परब, मिलिंद प्रभू, सुप्रिया परब, सिद्धी परब, सायली परब, सत्यवान परब, रवी परब, राधिका परब, श्रीराम परब, अंकिता परब, अभय परब, सुनील परब, आशिष परब,प्रकाश परब,मनोज परब, शिवाजी परब, डी आर्ट स्टुडिओच्या विना मांजरेकर इत्यादी उपस्थित होते.फोटो कॅप्शन. मराठा समाजाने आयोजित केलेल्या परबज्ञाती बांधवांच्या कौटुंबिक मेळाव्यास आणि हीरक महोत्सवी वर्ष शुभारंभ प्रसंगी इन्कम टॅक्स चीफ कमिशनर निवृत्त श्री अरुण पवार यांचा सत्कार करताना माझी मंत्री व समाजाचे अध्यक्ष अनिल परब सोबत उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब, जनरल सेक्रेटरी जी एस परब, महिला संघटक श्रीमती प्रतीक्षा परब, माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, विनायक परब आणि मान्यवर उपस्थित होते.