Home स्टोरी पनवेलकर कुटुंबियांची वारकरी दिंडी विविध उपक्रमांनी संपन्न…!

पनवेलकर कुटुंबियांची वारकरी दिंडी विविध उपक्रमांनी संपन्न…!

114

सावंतवाडी प्रतिनिधी: परवाच सप्त्याच्या सरते रात्रीला पनवेलकर कुटुंबियांच्या निवास स्थानावरून निघालेल्या वारकरी दिंडीत सहभागी होण्याचा योग आला. दरवर्षी नित्य नेमाने या दिंडीची साग्रसंगीत रवानगी करणाऱ्या पनवेलकर कुटुंबियांनी जपलेल्या या सांस्कृतिक वारशाला तोड नाही. उल्हास पनवेलकर यांचे पिताश्री स्व. भास्कर पनवेलकर यांनी सुरू केलेली ही दिंडीची अनुकरणीय प्रथा त्यांचे चिरंजीव आणि संपूर्ण कुटुंबिय, कुठेही गाजा वाजा न करता अविरत पणे पुढे नेत आहेत हे कौतुकास्पद आहे.

 

संपूर्ण देश सद्या राम रसात न्हाऊन निघाला असताना आणि चौकूळ च्या वातावरणात सप्त्याच्या भजनांची धुंद पसरली असताना शनिवारी पनवेलकर कुटुंबियांतर्फे आणखी एक अनोखा असा प्रकल्प राबविला गेला. जिल्हा परिषद शाळा क्र.१ च्या मुलामुलींना हनुमान चालिसा पुस्तकांचे मोफत वाटप करून त्यांच्यासमोर हनुमान चालिसा वाचनाचा आनंद दायी कार्यक्रम उल्हास पनवेलकर यांनी सहकुटुंब सादर केला आणि कोवळ्या मुलांच्या मनात राम भक्तीची बीजे पेरली. आपण सर्वांनी मिळून पनवेलकर कुटुंबियांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करूया. जय बजरंगबली !