Home स्टोरी पत्रकार विवेक उर्फ राजू परब यांचा चिंदर ग्रामपंचायत येथे सन्मान!

पत्रकार विवेक उर्फ राजू परब यांचा चिंदर ग्रामपंचायत येथे सन्मान!

132

 

 

मालवण प्रतिनिधी:

 

 

देशाच्या स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सव सांगता सोहळा औचित्य साधून चिंदर ग्रामपंचायतच्या वतीने गावचे सुपुत्र म्हणून पत्रकार विवेक उर्फ राजू परब यांचा प्रभारी सरपंच दीपक सुर्वे,   मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी ‘आप्पासाहेब गुजर’ व मालवण कृषी अधिकारी संजय गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून पत्रकार विवेक परब न्याय देत असतात असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

यावेळी  ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी प्रभाकर जाधव, आरोग्य विभाग विस्तार अधिकारी सुजय बांगर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, स्वरा पालकर, रिया  घागरे, जान्हवी घाडी, सानिका चिंदरकर, माजी सभापती हिमाली अमरे, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, सौ. राजश्री कोदे, दिगंबर जाधव, शशीकांत नाटेकर, निशिगंधा वझे, नारायण पाताडे, आरोग्य सेवक संतोष गोसावी, विश्राम माळगांवकर, भाई तावडे, डाँ. विवेक घाडगे, सिध्देश नाटेकर, समिर अपराज, अरविंद घाडी, डाँ. मिलिंद कांबळी, दयाळ भाऊ अपराज, पंढरीनाथ कामतेकर, प्रिया पालकर, अमृता तोरसोळकर,  रणजित दत्तदास, शिक्षक, पालक विद्यार्थी, आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भिमाशंकर शेतसंदी यांनी तर समारोप ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर यांनी केले.