Home स्टोरी पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित संयुक्त योगोपचार शिबिराचा सांगता समारंभ...

पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित संयुक्त योगोपचार शिबिराचा सांगता समारंभ संपन्न.

113

कुडाळ प्रतिनिधी: पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित केलेल्या संयुक्त योगोपचार शिबिराचा सोमवार दि २७ जानेवारी २०२५ रोजी वासुदेवानंद हॉल कुडाळ येथे सांगता समारंभ संपन्न झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ शहरात योग प्रसाराचे कार्य खूप मोठ्या वेगाने चालू आहे. कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबिरामध्ये पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत विशेष योगाभ्यास घेण्यात आला . ५ दिवसांचे हे संपुर्ण योगशिबिर दि २३ जानेवारी ते २७ जानेवारी २०२५  या कालावधी पर्यंत यशस्वी पणे संपन्न झाले. अनेक योगसाधकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेऊन योगाभ्यासाचा लाभ घेतला. आज या शिबिराचा सांगता समारंभ कार्यक्रम योगवर्गात घेण्यात आला.

त्यावेळी कुडाळ शहरातील खरेदी विक्री संघाचे व्हा चेअरमन श्री अरविंद शिरसाठ यांच्या हस्ते पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी श्री शेखर बांदेकर यांना शाल , श्रीफळ आणि भेटवस्तु देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी

सामाजिक कार्यकर्ते श्री काका कुडाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुडाळ श्री गजेंद्र पालवे, आयुर्वेद वैद्य श्री सुविनय दामले , श्री गणेश कराडकर, डॉ सौ शितल देसाई आणि प्राध्यापक श्री प्रशांत केरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या शिबिरामध्ये पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग चे जिल्हाप्रभारी श्री शेखर बांदेकर यांनी सतत ५ दिवस शिबीर घेतल्यामुळे सर्व शिबिरार्थींनी आभार व्यक्त केले. सुत्र संचानल कु स्नेहल कडोलकर आणि आभार प्रदर्शन श्री नारायण सावंत यांनी केले.

सदर चे शिबीर हे वासुदेवानंद हॉल कुडाळ येथे घेण्यात आले, श्री प्रसाद नाईक यांनी हॉल मोफत उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सुमारे ८५ योग साधकांची दररोज उपस्थिती या शिबिरास लाभली . शिबिर संपले तरी संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे दि ३० जानेवारी २०२५ पासून सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलेले आहे त्यात सर्वांनी सहभाग घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने योगाभ्यास शिकावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले .