Home स्टोरी पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित केलेल्या “अग्निहोत्र” कार्यक्रमास सावंतवाडी येथे...

पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित केलेल्या “अग्निहोत्र” कार्यक्रमास सावंतवाडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.

38

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये योग प्रसाराचे कार्य खूप मोठ्या वेगाने चालू आहे. सध्या सावंतवाडी येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर चालू आहे. शंख प्रक्षालन, त्राटक, जलनिती, सूत्रनिती, नस्यनीती, नेत्रनिती, वमन क्रिया, ॲक्युप्रेशर, योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम यासारख्या अनेक उपयुक्त अशा योगक्रियांचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिळत आहे. या योगाभ्यासातील महत्वाचा घटक असलेला अग्निहोत्र ( होमहवन, यज्ञ ) प्रशिक्षण* हा कार्यक्रम आज बुधवार दि १५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजता योगवर्गात घेण्यात आला. त्यावेळी प्रज्वलित केलेली हवनकुंडे आणि मंत्रोच्चारामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न वाटत होते.

या शिबिरामध्ये पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग चे जिल्हाप्रभारी श्री शेखर बांदेकर यांच्या मार्फत सर्व शिबिरार्थ्यांना होमहवन ( यज्ञ ) प्रशिक्षण देण्यात आले. सावंतवाडी मधील श्री. नारायण सावंत, श्री. अभय सावंत, सौ. ऐश्वर्या सावंत, श्री. नारायण राणे, श्री. लक्ष्मण राणे, श्री. प्रकाश आंबीटकर. सौ. निशिगंधा सावंत, सौ.नम्रता राणे, कु.स्नेहल कडोलकर, श्री. राजन राणे, सौ. मृणाली राणे, सौ. प्रतीक्षा देसाई, सौ. सुपर्णा भाईप, सौ.चैताली गवस, सौ. श्रद्धा सावंत, श्री.नागराज चंद्राप्पागोळ ,श्री.संदीप बांदेकर, सौ.सुधा बांदेकर, श्री.दिगंबर पावसकर, सौ. रेखा जगताप, श्रीम. संध्या सौदागर, श्री.भरत धुरी, श्री. सज्जन नाईक, श्री .धैर्यशील शिर्के यांनी होमहवन प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण घेतले.