Home क्राईम पट्टेरी वाघाचे कातडे आणि नखांची तस्करी करणार्‍या ३ जणांना अटक

पट्टेरी वाघाचे कातडे आणि नखांची तस्करी करणार्‍या ३ जणांना अटक

137

सातारा:  पट्टेरी वाघाचे कातडे आणि नख यांची तस्करी करणार्‍या महाबळेश्वर येथील ३ जणांना मुंबई (बोरिवली) पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन जुंद्रे, मंजूर मानकर आणि सुरज कारंडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.संशयितांकडून वाघाचे सोलून काढलेले काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले ११४ सें.मी. लांब, १०८ सें.मी. रुंद वाघाचे कातडे आणि १२ वाघनखे असा १० लाख ६० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संशयितांवर वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम १९७२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कराड येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेल्या स्टार कासवाची तस्करी करणारी टोळी पोलिसांनी पकडली होती.