सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी याबाबत सविस्तर विवेचन केलं आहे. शिवसेना कुणाची? याबाबतचा निर्णय येणे अजून बाकी आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचा निर्णय पलटवूही शकते. कारण गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती करताना विधानसभा अध्यक्षांनी लेजिसलेटिव्ह पार्टीच्या बेसिसवर ही नियुक्ती केली. राजकीय पक्ष म्हणून निर्णय दिला नाही. तोच प्रकार शिवसेनेचा ताबा देताना झाला आहे. तुम्ही लेजिस्लेचर पार्टीच्या बेसिसवर निर्णय दिला. तुम्ही सर्व अॅफिडेव्हिट चेक करायला हवे होते, असं सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला म्हणू शकतं. सर्वोच्च न्यायालय आयोगाचा निकाल पलटवूही शकतं. पक्ष परत उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो. ती शक्यता आहे, असं सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.
पक्षाचा ताबा कुणाला द्यायचा हे मॅटर पेंडिंग आहे. फक्त आमदार, खासदारांची संख्या नाही तर सर्व चेक केलं पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं आहे. सुट्टीनंतर त्यावर निर्णय होईल. पक्ष पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो, असं सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं. पक्ष कुणाकडे राहणार त्यावर कोर्ट एक दोन महिन्यात निर्णय देणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.