Home स्टोरी पंतप्रधान १७ सप्टेंबरला नवीन संसदेवर राष्ट्रध्वज फडकावणार !

पंतप्रधान १७ सप्टेंबरला नवीन संसदेवर राष्ट्रध्वज फडकावणार !

158

१५ सप्टेंबर वार्ता: येत्या १८ ते २२ सप्टेंबर या काळात संसदेच्या विशेष अधिवेशनात ४ विधेयक मांडली जाणार आहेत. राज्यसभेने याविषयी माहिती दिली आहे.

 

१७ सप्टेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनावर राष्ट्रध्वज फडकावतील. या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आणि विश्‍वकर्मा जयंतीही आहे. भाजपने आपल्या सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना व्हीप (पक्षादेश) जारी केला आहे. जेणेकरून सर्व खासदार संसदेच्या दोन्ही सभागृहांत ५ दिवस उपस्थित रहातील.