Home स्टोरी पंतप्रधान मोदी ५०,००० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार!

पंतप्रधान मोदी ५०,००० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार!

126

६ जुलै वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून चार राज्यांच्या दौरा करणार आहेत. यावेळी ते सुमारे ५०,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत. पंतप्रधान मोदी शुक्रवार दि. ७ जुलै रोजी सकाळी १०:५० च्या सुमाराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायपूरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होईल. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथं दुपारी २:३० च्या सुमाराला पंतप्रधानांचे आगमन होईल. तिथे गीता प्रेस गोरखपूरच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात सहभागी होतील. त्यानंतर ते गोरखपूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर, संध्याकाळी ५ च्या सुमारास, वाराणसी येथे पंतप्रधानांचे आगमन होईल. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील.

शनिवार दि. ८ जुलै रोजी सकाळी १०:४५ वाजता, तेलंगणा राज्यातील वरंगल येथे पंतप्रधानांचे आगमन होणार असून ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमात ते विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. पंतप्रधानांचे दुपारी ४:१५ च्या सुमारास बिकानेर येथे आगमन होईल. तिथे ते राजस्थानमधील विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील.