Home स्टोरी पंतप्रधान नरेंद्र मोदिंचे पापुआ न्यू गिनी येथे भव्‍य स्‍वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदिंचे पापुआ न्यू गिनी येथे भव्‍य स्‍वागत

87

२१ मे वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पापुआ न्यू गिनी येथे आज (दि.२१) पोहोचले. येथे त्‍यांचे भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पापुआ न्यू गिनी पंतप्रधान जेम्‍स मारापे यांनी विमानतळावर स्‍वागत केले. यावेळी त्‍यांनी चरण स्‍पर्श करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींची पापुआ न्यू गिनीची ही पहिलीच भेट आहे. तसेच या देशाला भेट देणारे ते भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. त्यामुळेही हा दौरा खूप खास आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये संध्याकाळनंतर राष्ट्रप्रमुखांचे पारंपारिक स्वागत केले जात नाही, परंतु पंतप्रधान मोदींच्या बाबतीत पापुआ न्यू गिनीने आपली परंपरा बदलली आहे. पंतप्रधान मोदींचे पापुआ न्यू गिनी येथे आगमन होताच त्यांचे पूर्ण राज्य सन्मानाने पारंपारिक स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान स्वतः विमानतळावर पोहोचले. यानंतर पीएम मोदींना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. येथे परदेशी भारतीयांनीही पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

पापुआ न्यू गिनी भेटीदरम्यान, PM मोदी सोमवारी फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC III समिट) च्या तिसर्‍या शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष असतील. FIPIC शिखर परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. सामान्यत: कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांमुळे ते सर्व क्वचितच एकत्र येतात. 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान FIPIC लाँच करण्यात आले होते. FIPIC गुंतवणुकीव्यतिरिक्त, PM मोदी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर-जनरल सर बॉब डाडे, पंतप्रधान मारापे आणि शिखर परिषदेत सहभागी होणार्‍या काही PIC नेत्यांशी द्विपक्षीय संवादही साधतील.