मुंबई: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात ‘एकात्म मानवदर्शन’ या महत्त्वाच्या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत ‘Integral Humanist Approach: Roadmap for Atmanirbhar Bharat’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होईल. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. उज्वला चक्रादेव, कुलगुरू, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई या असतील. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांची उपस्थिती लाभणार आहे.
‘Integral Humanism & Research’ या विषयावर पीएच.डी. मार्गदर्शकांसाठी (PhD guides) विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच शिक्षक व एनएसएस कार्यक्रम अधिकारी यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले असून, यात प्रमुख व्याख्याते म्हणून मा. श्री. प्रफुल्ल केतकर, संपादक: ऑर्गनायझर हे मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव आणि प्रा. डॉ. निलेश ठाकरे, अधिष्ठाता मानव्यविद्या शाखा यांनी केले आहे. हा कार्यक्रम पाटकर सभागृह, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई – ४०० ०२० येथे पार पडेल. या निमित्ताने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारधारेवर सखोल चर्चा आणि मंथन होणार आहे.







