Home स्टोरी न्हावेलीत विजेचा खेळखंडोबा…! ग्राहक हैराण 

न्हावेलीत विजेचा खेळखंडोबा…! ग्राहक हैराण 

73

न्हावेली वार्ताहर: न्हावेली परिसरात गेले १० दिवस विजेचा खेळखंडोबा सुरु असल्याने वीज ग्राहक हैराण झाले आहेत.न्हावेली परिसरात १० दिवस रात्री वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.त्यामुळे ग्राहकांची फारच गैरसोय होत आहे.मान्सूनपूर्व विजेच्या दुरुस्तीची कामे वेळीच केली नाहीत.तसेच वीज खांब व वाहिन्यांवर आलेली झाडा- झुडुपांची तोडणी न केल्याने विजेचा खेळखंडोबा सुरु असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.वीज कंपनीने यात सुधारणा करावी,अशी मागणी न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी केली आहे.