सावंतवाडी प्रतिनिधी: दोन महिन्यापूर्वी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिव्हाळा आश्रमाला रोग रक्कम व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या होत्या त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष बिर्जे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जवळ आश्रमातील आश्रय दात्यांना लाईट गेल्यावर काळोखात राहावं लागतं त्यावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडे इन्वर्टरची मागणी केली होती संस्थेच्या रूपा मुद्राळे यांनी सामाजिक बांधिलकी कडून प्रयत्न केले जाईल असा शब्द दिला होता त्यासाठी संस्थेच्या रूपा गौंडर (मुद्राळे) यांनी प्रयत्न करून सदर शब्द न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट यांना दिला असता त्यांनी त्यासाठी लगेचच होकार दिला आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी जिव्हाळा सेवा आश्रमाला या ट्रस्टमार्फत इन्व्हर्टर ड्रायफर व जीवनावश्यक साहित्य जवळपास ५० हजार रुपये किमतीच्या या वस्तू देण्यात आल्या ट्रस्टचे अध्यक्ष बिरजे यांनी न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट ख्रिश्चनवाडी माजगाव गरड सावंतवाडी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे आभार मानले.
या प्रसंगी उपस्थित अधिकारी ऑगस्टीन फर्नांडिस, इशेद परेरा, मायकल फर्नांडिस, ऋषिकेश नाईक तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रूपा मुद्राळे शरदीनी बागवे व रवी जाधव उपस्थित होते.