Home स्टोरी ‘नो हॉँकिंग डे’ पाळा! मुंबई पोलिसांच्‍या वाहतूक नियंत्रण शाखेची घोषणा!

‘नो हॉँकिंग डे’ पाळा! मुंबई पोलिसांच्‍या वाहतूक नियंत्रण शाखेची घोषणा!

123

१४ जून वार्ता: मुंबई पोलिसांच्‍या वाहतूक नियंत्रण शाखेने ध्‍वनी प्रदूषण आणि त्‍याचा सार्वजनिक आरोग्‍यावर होणारा परिणाम टाळण्‍यासाठी, तसेच वाहनांच्‍या हॉर्नच्‍या (भोंग्‍याच्‍या) अनावश्‍यक वापराला आळा घालण्‍याच्‍या उद्देशाने १४ जून या दिवशी ‘नो हॉँकिंग डे’ (हॉर्न न वाजवण्‍याचा दिवस) पाळण्‍याची घोषणा केली आहे. ध्‍वनीप्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्‍य यांची हानी होत असल्‍याने पोलिसांनी हॉर्न (भोंगा) न वाजवता या उपक्रमाला सकारात्‍मक प्रतिसाद देण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. याचे उल्लंघन केल्‍यास कारवाई होईल.