सावंतवाडी प्रतिनिधी: वाघाच्या हल्यात राजा तवटे यांची मुरा जातीची रेडी जखमी झाली होती. त्यामुळे त्यांचे फार आर्थिक नुकसान झाले. त्यांना कोठेतरी थोडीफार आर्थिक मदत करण्याच्या उद्देश्याने आज श्री. राजा तवटे हे गेली ५ ते ६ वर्षे श्री लक्ष्मीनारायण दुध संस्था हळदीचे नेरूर या संस्थेला दुध पुरवठा करतात. त्यामुळे सर्वानुमते या संस्थेतील सर्व दुध उत्पादक कार्यकारणीतील मंडळ तसेच अध्यक्ष व सचिव ॲड. नीता विष्णु कविटकर एकत्र येऊन एखाद्या शेतकऱ्याचे आकस्मिक नुकसान झाले असता सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे या विचाराने व उद्देश्याने श्री लक्ष्मीनारायण संस्थेतर्फे श्री राजा तवटे या दुध उत्पादक शेतकऱ्याला १० हजार रू. चा धनादेश मदत म्हणून दिला. यावेळी सर्व सभासद हजर होते.
दुध व्यवसाय हा शेतकऱ्याचा आर्थिक लाभ करून देणारा व्यवसाय आहे त्यास सहाय्य व्हावे अशाच संस्थेचा उद्देश्य व उपक्रम आहे. यावेळी. मनोहर परब, सखाराम गवस, दिपक ढवळे, दया भिके, जयसिंग चव्हाण, कैलास नेरकर आधी उपस्थित होते.







