सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडीत केंद्रीय शिक्षा मंत्रालय विभागातर्फे नॅशनल बुक ट्रस्टची फिरती पुस्तक परिक्रमा बुक्स ऑन व्हील्स दाखल झाली. सावंतवाडी बस स्थानक येथे या फिरत्या पुस्तक बसचे स्वागत सावंतवाडी येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत व अखिल मराठी पत्रकार संघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले कणकवली कुडाळ या तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये ही फिरती पुस्तकांची बस एक आकर्षण ठरली. त्यानंतर आज २५ डिसेंबर ते २८ डिसेंबर पर्यंत तीन दिवस ही फिरती पुस्तक प्रदर्शन बस सावंतवाडीत साहित्यिक वाचक नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.

यावेळी राणी पार्वती देवी हायस्कूलच्या संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी आजच्या मोबाईल युगात आजची तरुण पिढी तसेच आज सगळेच जण पुस्तकाकडे फारसे लक्ष देत नाहीत. मोबाईल मध्येच लक्ष घालत आहेत. त्यामुळे आपल्याला इतिहास आणि वास्तव्याची सांगड घालत शैक्षणिक व विचारांची प्रगती साधण्यासाठी पुस्तक हेच दैवत आहे. आणि हे दैवत आपण हाती बाळगायला जावे आणि हे काम या फिरत्या पुस्तक बसच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. त्याचा लाभ सावंतवाडीतील सर्व महाविद्यालयीन कॉलेज शाळा तसेच सुज्ञ नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. पुस्तकांची फिरती व्हॅन बस ही एक पुस्तक वाचनाची चळवळ व्यापक करण्याचे टाकलेले पाऊल म्हणावे लागेल. असे गौरव उद्गार त्याने काढले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव तथा तरुण भारत संवादचे प्रतिनिधी. ॲड संतोष सावंत, तालुका प्रतिनिधी विजय देसाई, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, रुपेश हिराप, कुणकेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, सावंतवाडी एसटी आग्रहाचे वाहतूक निरीक्षक प्रांजल धुरी, वाहतूक नियंत्रक संजय पुनाळेकर, वाहतूक नियंत्रक श्रीमती विद्या उर्फ निलांबरी पेडणेकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक रेश्मा सावंत, अमित कुमार मिश्रा, सुनील कुमार, गजराज सिंग, जगतसिंग रावत, उमेश राठोड आधी उपस्थित होते.

सावंतवाडी बस स्थानक येथे आज संपूर्ण दिवसभर शेकडो वाचकाने या फिरत्या बसमधील पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. उद्या शुक्रवारी २६ डिसेंबरला ही पुस्तक प्रदर्शनाची फिरती बस श्री पंचम खेमराज महाविद्यालय च्या परिसरात व राणी पार्वती देवी हायस्कूल च्या मैदानावर उपलब्ध असणार आहे. तरी त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.







