Home स्टोरी नूंह (हरियाणा) येथे हिंदूंच्या यात्रेवर दगडफेक करण्यात अग्रेसर असलेल्या ‘हॉटेल सहारा’वरही बुलडोझर...

नूंह (हरियाणा) येथे हिंदूंच्या यात्रेवर दगडफेक करण्यात अग्रेसर असलेल्या ‘हॉटेल सहारा’वरही बुलडोझर !**

143

एकूण ६०० इमारतींवर कारवाई !

नूंह (हरियाणा):– येथे हिंदूंच्या यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी सर्वांत आधी तिरंगा चौकातील ‘हॉटेल सहारा’च्या गच्चीवरून आक्रमण करण्यास आरंभ केला होता. तीन मजल्यांच्या या इमारतीवरून हिंदूंवर दगडफेक करण्यात आली होती. दंगलींच्या विविध व्हिडिओजमधून हे समोरही आले होते. हरियाणा पोलिसांनी आता या इमारतीवर बुलडोझर चालवत सर्व मजले पाडले आहेत. प्रशासनाचे म्हणणे आहे की, ही इमारत अनधिकृत होती.वर्ष २०१६ पासून हॉटेलच्या मालकाला यासंदर्भातील नोटीस दिली जात आहे, परंतु त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने ही कारवाई करण्यात आली, असे स्थानिक अधिकार विनेश कुमार यांनी सांगितले. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणा सरकारने आतापर्यंत ६०० हून अधिक अनधिकृत स्थानांना बुलडोझर चालवून नष्ट केले आहे.