सावंतवाडी प्रतिनिधी: निलेश सांबरे संस्थापक असलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे शैक्षणिक सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असुन कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासह राबवित असलेले विविध शैक्षणिक उपक्रम कोकणाला दिशा देणारे आहेत. असे प्रतिपादन सावंतवाडी येथील अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. नकुल पार्सेकर यांनी केले.
शिवसेना उपनेते तथा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून कोकणातील शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी २५ लाख वह्यांचे वितरण करण्यात येत असुन सावंतवाडी तालुक्यातील शाळांमधील आयोजित कार्यक्रमात अँड नकुल पार्सेकर बोलत होते. यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख वाल्मिक बिलसोरे, असनिये हायस्कूलच्या मुख्याध्यापिका करेक्शन केलं ही बातमी घ्या श्रीम. जान्हवी सावंत, विलवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर, ओटवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, माजगाव हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका पि. आर. गावडे तसेच तालुक्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ॲड. नकुल पार्सेकर यांनी निलेश सांबरे यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याचे कौतुक करतानाच रत्नागिरी येथे अत्याधुनिक रुग्णालय उभारून गोरगरीब रुग्णांना निःशुल्क सेवा देण्याचे ईश्वरी कार्य करीत असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात निलेश सांबरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे स्पर्धा परिक्षा केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करून जिल्ह्यात अधिकारी निर्माण करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख वाल्मिक बिलसोरे म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी शैक्षणिक उपक्रमांसह आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती या क्षेत्रात सातत्याने कार्य केले जाते. संस्थेच्या स्पर्धा परीक्षा विभागामार्फत करियर मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांत सहभाग घ्यावा. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून नियोजन केल्यास त्याचप्रमाणे जिद्द, आत्मविश्वास व प्रयत्नाच्या जोरावर आपले ध्येय गाठू शकतात.