ठाणे: ठाणे कोर्ट नाका फुटपाथवर गेल्या एक महिन्यापासून राहत होता. या व्यक्तीचे नाव जिग्नेश (वय ५५ वर्ष ) आहे. जिग्नेश अति जखमी अवस्थेत ठाणे कोर्ट नाका फुटपाथवर राहत होता. संबंधित माहिती आजूबाजूला राहणाऱ्या काही नागरिकांनी जीवन आनंद संस्थेचे संदिप परब यांना कळवली. माहिती मिळताच संदिप परब आणि सहकारी मित्र भाईदास माळी, गोविंद मार्गि व गावडे काका ठाणे कोर्ट नाका फुटपाथवर जिथे जिग्नेश राहत होता त्या ठिकाणी पोहचले. त्यानंतर जिग्नेश च्या पायातील जखमेतील १५ किडे साफ करुन जिग्नेश ला जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रम वीरार येथे दाखल केले. आणि जिग्नेशला नवजीवन दिलं.
ज्या व्यक्तींना अशा समाजकार्यात मदत करायची असेल त्यांनी खालील स्कॅनर वर आपली मदत पाठवावी. आपली छोटी मदत निराधार बांधवांचे जीव वाचवु शकतात.