सावंतवाडी प्रतिनिधी: निराधार अंध अपंग संजय गांधी योजना यामध्ये देण्यात येणारे मानधन वाढवून देण्यात यावे. अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख एडवोकेट नीता सावंत, कविटकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी निश्चितपणे याकडे लक्ष घालून आपण मानधनात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. असे आश्वासन दिले आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १००० मानधन आहे ते २००० वाढवण्यात यावे. तसेच वार्षिक उत्पन्न २१००० आहे. ते ५०,००० करण्यात यावे. अशा स्वरूपाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
Home स्टोरी निराधार अंध अपंग संजय गांधी योजनाअंतर्गत देण्यात येणारे मानधन वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्याना...