Home स्टोरी नारायण राणे सत्तेत आल्यावरच टालांबा धरणाच्या हालचाली कश्या सुरु होतात ? युवासेना...

नारायण राणे सत्तेत आल्यावरच टालांबा धरणाच्या हालचाली कश्या सुरु होतात ? युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी 

166

शासनाचे स्पष्ट निर्देश असताना बुडीत क्षेत्रातील भुसंपादनाची मोजणीची निविदा निघतेच कशी ? 

बुडीत क्षेत्रातील २००० कुटुंबाना उध्वस्त करण्याचा कुटील डाव…! आधी पुनर्वसन…..मगच धरण……. 

 

सिंधुदुर्ग: आतापर्यंत अंदाजे २०० कोटी धरणासाठी खर्च झाले. मात्र अद्याप धरणाचे १०% काम पूर्ण झाले नाही. पैसे गेले कुठे? याची चौकशी राणेंनी करावी?  महाराष्ट्र शासनाने ६०० हेक्टर चा वनप्रस्ताव २०१२ मध्ये नाकारला असताना निविदा कोणाच्या सांगण्या वरून होते? असे प्रश्न युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांना उपस्थिती करत माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी पुढे म्हणाले की, निविदा कोटींच्या घरात,आमचे खासदार, आमदार असेपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही लोकांना न विचारता निविदा काढण्याची राणे सत्तेत आल्यावर सगळ्या हालचाली सुरु झाल्या. एवढ्या वर्षात राणेंना माणगाव खोर दिसलं नाही. आता मतांसाठी माणगाव खोऱ्यातील लोकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न होतोय. नारायण राणे सत्तेत आल्यावरच टालंबा धरण सुरु करण्याच्या हालचाली कश्या सुरु होतात ? वसोली गावाची संयुक्त मोजणीची निविदा निघाली, निविदा कोणाच्या सांगण्यावरून निघाली केंद्रात राज्यात सत्ता राणेंच्या पक्षाची आता राणेनी स्पष्ट करावं. टालंबा धरण आता होणे शक्य नाही. आता पुलास निळेली सारखी छोटी धरणे बांधवीत. आमदार वैभवजी नाईक साहेब यांनी केटी बंधारे मंजूर केले होते. परंतु ह्याच राणे समर्थकांनी तक्रारी करून ते होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले. असा आरोपही युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केला आहे.

तसेच राणेंनी सतत माणगाव खोऱ्यावर अन्याय केला आहे. मग तो वनसंज्ञा च्या माध्यमातून असो, आकरपड जमिनीच्या च्या माध्यमातून असो अथवा टालंबा धरण च्या माध्यमातून असो, अथवा आता अंजीवडे गांवात होत असलेल्या अदानी च्या वीज प्रकल्पाच्या माध्यमातून असो. राणेंच्या मागच्या निवडणुकीत दादागिरीचा थरार माणगाव खोऱ्याने अनुभवला आहे. लाभ क्षेत्रातील लोक आता कालव्या साठी जागा देतील का? राणे निवडून आले तर बारसू सारखी परिस्थिती होईल लोकांना न जुमानता धरण होईल.आमचे खासदार विनायकजी राऊत साहेब आमदार वैभवजी नाईक कायम स्थानिकांच्या पाठीशी उभे राहिलेत यापुढे देखील राहतील. हिंमत असेल तर मोजणी करून दाखवाच असे खुले आवाहन युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी माजी मंत्री नारायण राणे यांना केले आहे.