Home स्टोरी नारळ लढवण्याच्या युवासेनेच्या स्पर्धेस तुफान गर्दी !

नारळ लढवण्याच्या युवासेनेच्या स्पर्धेस तुफान गर्दी !

380

मालवण: मा.आमदार वैभवजी नाईक* यांच्या संकल्पनेतून युवासेना मसुरे विभाग आयोजित नारळ लढवने स्पर्धा युवासेना मसुरे विभाग यांच्यावतीने आयोजित केली होती या स्पर्धेस युवकांचा प्रचंड असा प्रतीसाद मिळाला या स्पर्धेत १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.प्रत्येक स्पर्धकाला ५ नारळ देऊन स्पर्धा आयोजित केली गेली.यावेळी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे मुंबई सुधार समिती अध्यक्ष व वांद्रे विधानसभा प्रमुख सदा परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व युवासेना जिल्हा प्रमुख व कुडाळ चे उपनगराध्यक्ष युवासेना सचिव मंदार शिरसाठ व मालवण नगरसेवक मंदार केणी यांनी नारळ लढवून स्पर्धेस सूरुवात केली .स्पर्धेचा प्रथम मानकरी ठरला किरण मेस्त्री याला रोख रू ५००० व चषक आणि द्वितीय मानकरी ठरला भार्गव वरक याला रोख रू ३००० व चषक देण्यात आले.तमाम शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला.यावेळी मसुरे विभाग प्रमुख पिंट्या गावकर,गोळवन विभाग प्रमुख भाऊ चव्हाण, रेवंडी सरपंच अमोल वस्त,संदीप महाडेश्वर, उपतालूका प्रमुख युवासेना अमित भोगले, युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत,युवासेना शाखा प्रमुख पप्पू परब,किशोर कसले, निलेश मालवणकर, आयवण फर्नांडिस, बाबू आंगणे, तनुराज आंगणे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.