Home स्टोरी नागोठणे येथे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्गा’चे संतांच्या हस्ते अनावरण!

नागोठणे येथे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्गा’चे संतांच्या हस्ते अनावरण!

756

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक दिनांक : १३ मे २०२३.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मस्थानाकडे जाणार्‍या मार्गाला त्यांचे नाव देऊन नागोठणे ग्रामस्थांकडून त्यांच्या धर्मकार्याचा गौरव!

रायगड:- सनातन धर्माचा प्रसार अखिल विश्वात करणारे आणि विश्वकल्याणासाठी अविरत झटणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या नागोठणे (रायगड) येथील जन्मस्थानाकडे जाणार्‍या मार्गाला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्ग’ असे नामकरण करून नागोठणे ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि मान्यवर यांच्या शुभहस्ते १२ मे या दिवशी या मार्गाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा सोहळा पार पडला. या मंगल सोहळ्याचा शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे सहसंघटन संपर्कप्रमुख श्री. किशोरशेठ जैन, नागोठणे येथील सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच सौ. रंजना रवींद्र राऊत, माजी सरपंच मोहन नागोठणेकर, भाजपचे सचिन मोदी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रोहिदास शेळके, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक श्री.अभय वर्तक यांसह सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मामे बहीण श्रीमती शकुंतला ओक, ग्रामस्थ आणि सनातनचे साधक यांनी लाभ घेतला. या सोहळ्याला पू. (सौ.) संगीता जाधव आणि ह.भ.प. बापू रावकर यांची वंदनीय उपस्थिती या वेळी लाभली.

१२ मे १९४२ या दिवशी (वैशाख कृष्ण सप्तमी) या दिवशी रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील ‘ब्राह्मणआळी’मधील ‘वर्तकवाडा’ या वास्तूमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्म झाला. या वास्तूकडे जाणार्‍या मार्गाचे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्ग’ असे नामकरण करण्याचा ठराव नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये एकमताने करण्यात आला आहे.

रायगडच्या सात्त्विक भूमीचा साधनेसाठी लाभ करून घ्यावा! – सद्गुरु अनुराधा वाडेकर, धर्मप्रसारक, सनातन संस्था

आध्यात्मिकदृष्ट्या मुंबई आणि ठाणे येथे रज-तम अधिक आहे. त्या तुलनेत रायगड येथे सत्त्वगुण अधिक आहे. त्यामध्येही नागोठणे अधिक सात्त्विक आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा येथे जन्म झाला, जे येथे रहात आहेत, ते सर्व भाग्यवान आहेत. अध्यात्म, तसेच साधना आणि जीवनात ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ समजून घेऊन या सात्त्विक भूमीचा साधनेसाठी लाभ करून घ्यावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ यांच्यामुळे ‘नागोठणे’ची ओळख संपूर्ण जगात होईल! – किशोरशेठ जैन, संपर्कप्रमुख, शिवसेना, रायगड

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा येथे जन्म झाला, ही आम्हा नागोठणेवासियांसाठी भाग्याची गोष्ट आहे. येथील मार्गाला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ यांचे नाव देण्याचा ठरावाला ग्रामपंचायतीमध्ये सर्व ग्रामस्थांनी एकमताने मान्यता दिली. नागोठणे गाव हे आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या स्मारकामुळे संपूर्ण जगात ओळखले जाईल.

भविष्यात नागोठणे येथे मोठे तीर्थस्थळ निर्माण होईल! अभय वर्तक, धर्मप्रसारक, सनातन संस्था

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले इंग्लंडमधून आल्यानंतर ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर नागोठणे येथील श्री जोगेश्वरी मंदिरात त्यांनी घेतलेल्या प्रवचनाचा लाभ गावातील अनेकांनी घेतला आहे. त्यांचे सदगुरु प. पू. भक्तराज महाराज यांनी त्यांना ‘जगभरात कीर्ती होईल’, असा आशीर्वाद दिला. भविष्यात नागोठणे येथे मोठे तीर्थस्थळ निर्माण होईल.

सनातन प्रभात’च्या ‘लँड जिहाद – राष्ट्रव्यापी षड्यंत्र’ या ‘गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिके’चे या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी सर्वांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याची माहिती देणारा चित्रफित दाखवण्यात आली.

आपली नम्र, सौ. नयना भगत प्रवक्ता, सनातन संस्था (संपर्क क्र. : 9920015949)