Home स्टोरी नागला बंदर येथील ऐतिहासिक किल्ला नामशेष केल्याची धक्कादायक कबुली?

नागला बंदर येथील ऐतिहासिक किल्ला नामशेष केल्याची धक्कादायक कबुली?

108

महाराष्ट्र राज्यातील गड-किल्ल्यांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारकडून व्यापक प्रयत्न सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातील नागला बंदर येथील ऐतिहासिक किल्ला दगडखाणी आणि क्रशर मशीनचालकांनी नामशेष केल्याची धक्कादायक कबुली पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नागला बंदर किल्ला हे राज्य संरक्षित स्मारक नसल्याचे सांगत हा किल्ला वाचवण्यासाठी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्र विषयक स्थळे व अवशेष या अधिनियमान्वे याच्या संरक्षणाबद्दल कारवाई करण्यास अडचणी येत असल्याची हतबलता संचालक तेजस गर्गे यांनी व्यक्त केली आहे. नागला बंदर किल्ल्याची आसपासची जमीन भूमाफियाने ताब्यात घेऊन कोणतीही परवानगी न घेता हा किल्ला असलेला डोंगर पूर्णपणे तोडाला आहे. त्या ठिकाणी खडी क्रशर मशीन बसविण्यात आली असून हा डोंगर फोडून दगड व त्याचा बारीक चुरा सर्रास विकला जात आहे. पर्यावरण खात्याच्या कुठल्याही नियमांचे पालन न केल्यामुळे त्या ठिकाणी व आजुबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर व धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे. खाणकाम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्रही संबंधितांनी घेतले नसल्याचे पुरातत्त्व खात्याकडून सांस्कृतिक कार्य विभागाला कळवण्यात आले आहे.

नागला बंदर किल्ल्याची आसपासची जमीन भूमाफियाने ताब्यात घेऊन कोणतीही परवानगी न घेता हा किल्ला असलेला डोंगर पूर्णपणे तोडाला आहे. त्या ठिकाणी खडी क्रशर मशीन बसविण्यात आली असून हा डोंगर फोडून दगड व त्याचा बारीक चुरा सर्रास विकला जात आहे. पर्यावरण खात्याच्या कुठल्याही नियमांचे पालन न केल्यामुळे त्या ठिकाणी व आजुबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर व धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे. खाणकाम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्रही संबंधितांनी घेतले नसल्याचे पुरातत्त्व खात्याकडून सांस्कृतिक कार्य विभागाला कळवण्यात आले आहे.