१६ जून वार्ता: नागपूरच्या बुटीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक शाळकरी मुलगी गर्भवती असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शाळकरी मुलीने पोटात दुखत असल्याचे सांगितल्यावर तिला रुग्णालयात नेले होते. ज्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पिडितीने शेजारी राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीकडून गर्भवती असल्याची माहिती दिली आहे. संजय आत्माराम तायडे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित १५ वर्षीय मुलगी आईसह राहते. आई खासगी काम करते. त्यामुळे मुलगी नेहमी एकटी घरी असते. याच संधीचा फायदा घेऊन शेजारी राहणाऱ्या संजय तायडे याने मुलीसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.