Home स्टोरी नाईक मराठा मंडळ मुंबई दादर येथे ईतिहासकार केळुस्कर यांचे तैलचित्र अनावरण…!

नाईक मराठा मंडळ मुंबई दादर येथे ईतिहासकार केळुस्कर यांचे तैलचित्र अनावरण…!

259

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त येथील व सध्या मुंबईत वास्तव्यात असलेले चित्रकार शशिकांत भगवान सावंत यांनी आतापर्यंत आपल्या विविध  कुंचल्यातून चित्र रेखाटले आहेत. त्यांनी इतिहासकार स्वर्गवाशी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांचे पोट्रेट चित्र रेखाटले होते. या पोट्रेट तैल चित्राचे अनावरण मुंबई दादर येथे नाईक मराठा मंडळ मुंबई यांच्या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी चित्रकार शशिकांत भगवान सावंत यांचा सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी प्रा. बाळकृष्ण लळीत, डाॕ. दीपकगोवेकर, जेष्ठ समाजसेवक सुहास कबरे किरण नाईक आधी उपस्थित होते. यावेळी ताराबाई वेलिंगर ट्रस्ट आणि गोमंतक मराठा समाज मुंबई चे विश्वस्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दीपक गोवेकर म्हणाले. नाईक मराठा मंडळ याने स्वर्गीय गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांची पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी तैल चित्र अनावरण केले आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यावेळी राजहंस प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुहास कबरे, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण लळीत यांनी कौतुक केले.

यावेळी नाईक मराठा मंडळाचे किरण नाईक व आदी पदाधिकाऱ्यांनी शशिकांत सावंत हे चांगले चित्रकार आहेत. त्यांच्या कुंचल्यातून अनेक चित्र त्यांनी रेखाटले आहेत. त्यांचा येथे गौरव करण्याची संधी आम्हा समाजाला मिळाली हे खरोखरच कौतुकास्पद आहे. असे ते म्हणाले. यावेळी बांधव उपस्थित होते.