Home स्टोरी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत नवी मुंबईमधील हद्दीतील मार्गात बदल.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत नवी मुंबईमधील हद्दीतील मार्गात बदल.

188

जड तसेच अवजड वाहनांना बंदी.

 

 

 

उरण प्रतिनिधी:

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात साजरा करण्यात येणा-या गणेशोत्सव २०२३ च्या अनुषंगाने गणपती विसर्जनाच्यावेळी वाहतूक व गणपती मिरवणूका सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अवजड वाहनांना अधिसुचना सदंर्भ क. ०४ अन्वये निर्गमित करण्यात आलेली होती. त्यामध्ये बदल करुन खालील प्रमाणे अंशतः सुधारित अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

 

 

दिनांक २८/०९/२०२३ (दहा दिवस आणि अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन) तसेच दिनांक २९/०९/२०२३ रोजी ईद ए मिलाद हा सण असल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या जड – अवजड मालवाहतुक करणा-या वाहनांना शहराचे सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी (Park) करण्यास पुर्णतः नमुद दोन्ही दिवशी ००.०१ वाजले पासून ते गणपती विसर्जन / मिरवणुक व ईद ए मिलाद चे मिरवणुक संपेपर्यंत बंदी राहील.सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रवासी वाहतुक करणा-या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.सदरची अधिसुचना दिनांक २८/०९/२०२३ रोजी पासुन नमुद कालावधीत अंमलात राहील.अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागा तर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.सर्व वाहन मालक, चालक, एम टी यार्ड मालक व सी. एफ.एस मालक यांनी या वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्तालय नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.