Home Uncategorized नवी मुंबईत भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधात कायदा करण्याची...

नवी मुंबईत भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधात कायदा करण्याची मागणी…

106

नवी मुंबई : लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधातील कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करावा या मागणीसाठी नवी मुंबईत सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. नवी मुंबईतील कोपरी नाका सेक्टर २८ येथील ब्लू डायमंड हॉटेल चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती. भगवे झेंडे, भगव्या पताका हातात घेऊन हजारो नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. नवी मुंबईत भगवे वादळ अवतरले होते. युवा, महिला, विद्यार्थी, जेष्ठ, विविध हिंदू पंथ आणि संप्रदायाचे, हिंदू संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते. महिला भगिनींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, श्रद्धा वालकर प्रकरणी आरोपी आफताबला जन्मठेपेची शिक्षा मिळावी, लव्ह जिहाद विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिहादविरोधी कायदा झालाच पाहिजे, वंदे मातरम, जय श्रीराम.. जय श्रीराम शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देण्यात आली. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. या मोर्चात भाजपाचे नेते सहभागी झाले होते. लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, यासह विविध पक्षीय माजी नगरसेवक उपस्थित होते. मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न केले जात आहे, यानंतर धर्मांतरासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो. लव जिहाद विरोधात आजचा हा जनजागरण मोर्चा असून लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींवर धर्मांतरासाठी अत्याचार केले जातात, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने धर्मांतर बंदी कायदा लवकरात लवकर करावा. युवा पिढीमध्ये कारस्थान रचून अमली पदार्थांचा प्रचार केला जातो आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे. भारतीयांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून दिलं पाहिजे. आज हिंदू समाज संयमी आहे, मात्र त्याच्या संयमाचा अंत पाहू नका, लवकरात लवकर लव जिहाद विरोधातील कायदा करा, अशी हाक या मोर्चात देण्यात आली. या मोर्चाची सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली.