Home स्टोरी नवऱ्याच्या कुटुंबियांवर हुंड्याचे खोटे आरोप करणं क्रूरता! दिल्ली उच्च न्यायालय

नवऱ्याच्या कुटुंबियांवर हुंड्याचे खोटे आरोप करणं क्रूरता! दिल्ली उच्च न्यायालय

134

३ सप्टेंबर वार्ता: पती किंवा त्याच्या कुटुंबियांवर हुंड्यासाठी छळ किंवा बलात्काराचे खोटे आरोप करणे हे क्रूरता आहे. जर कोणी असे केले तर त्याला माफी नसावी, असं निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलं. पती-पत्नीमधील वादावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवत हे निरीक्षण नोंदवले. कौटुंबिक न्यायालयाने आपल्या आदेशात हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १३ (१) (आयए) अन्वये पतीला क्रूरतेच्या कारणास्तव पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार मान्य केला होता.

२०१२ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. २०१४ पासून दोघे वेगळे राहत असल्याचं सांगत कोर्टाने पत्नीचे अपील फेटाळून लावले. ९ वर्षांपूर्वी पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर हे प्रकरण सुरू झाले होते. याच प्रकरणात पत्नीने पतीच्या भावावर बलात्काराचा आरोप केला होता, ज्यात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.