कणकवली: विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शिक्षण सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाची एक अनोखी झलक निर्माण करून प्रशालेतील तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांची विविध वेशभुषा अंगिकारून भारताची विविधतेतून एकात्मता दाखवून दिली महाराष्ट्राच्या मातीत उमलेले लोकसंगीत व लोककला यांचा आधुनिक साज लेऊन लोकसंस्कृती जोपासली या सर्व बाल कलाकारानी संपूर्ण कणकवली शहरात साक्षर भारत घडविण्यासाठी भव्य दिव्य रॅली काढण्यात आली यामध्ये नवसाक्षर घडविण्यासाठी नादमधूर स्वरात घोषणांची आतषबाजी करत आणि साथीला लोकसंगीताचा व लोक गीताचा स्वर निनादत कणकवली शहर गजबजून गेले शहरातील सर्व नागरिकांनी विद्यामंदिर प्रशालेच्या या दिंडीला भरभरून प्रतिसाद दिला. नवसाक्षरतेच्या घोषणा वातावरण धुंद करून सोडत दिंडी पुढे पुढे वाटचाल करत होती. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय श्री वळंजू साहेब विद्यामंदिरची नवसाक्षर घडविणारी दिंडी पाहून भारावून गेले. संपूर्ण बालकांना लाडूचा खाऊ देऊन स्वागत केले विश्वस्त श्री हेमंतगोवेकर साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यामंदिरच्या सांस्कृतीक विभागाने आगळा वेगळा कार्यक्रम बसवून शिक्षण सप्ताहाला रंगत आणली आणि प्रबोधनात्मक प्रचार दिंडी साक्षरतेचा प्रचार करत करत कणकवली शहरातील नागरिकांना संदेश देत होती. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी. जे. कांबळे सर यांनी उत्तम नेतृत्व करत विद्यार्थी दिंडीला शुभेच्छा दिल्या पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले. जेष्ठ शिक्षक श्री वणवे सर यांनी दिंडीला उद्देशुन मार्गदर्शन केले. कला शिक्षक श्री प्रसाद राणे सर सौ केळुसकर सौ विदया शिरसाट श्री एस बी कदम सर व विद्यार्थी कलाकार मोठ्या संख्येने नवभारत साक्षरता दिंडीत सहभागी झाले होते.
Home स्टोरी नवभारत घडविण्यासाठी विद्यामंदिर माध्य प्रशाळेने लोकसंगीत व लोकगीतातून दिला साक्षरतेचा संदेश