सावंतवाडी: प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर ‘नमो चषक’ ज्युडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेमध्ये सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. यात ध्रुव मोहिते (सुवर्णपदक), यश कडव (रौप्यपदक), मयुरी जाधव.( कांस्यपदक), जयेश जाधव.( सुवर्णपदक), शार्दुल शिर्के (सुवर्णपदक), अबान बेग (सुवर्णपदक), ओम परब (सुवर्णपदक) यांनी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो , पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.