Home राजकारण नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? अजित पवार

नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? अजित पवार

137

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हटल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आज ते नाशिक दौऱ्यावर असून माध्यमांशी बोलत होते. सुप्रीम कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हणाल्यावरुन अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आम्ही बोललो तर सरकारमधील लोकांना वाईट वाटतं. सुप्रीम कोर्टाने असं म्हणणं ही शिंदे सरकारची नामुष्की असून, सरकारला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. पवार पुढे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने या सरकारला नपुंसक म्हटल्याने हा सरकारचा अपमान आहे. जे सरकार १४५ आकडा गाठेल, ते लोक सरकार चालवत असतो. कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर सरकारनं याचं आत्मचिंतन करावं. आपल्या संविधानात सांगितलं आहे की, प्रत्येकाने जाती धर्माचा आदर करावा. महापुरुषांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे, ती लक्षात घ्यावी. सगळ्या मुख्यमंत्र्यांचा काळ बघितला तर, कोर्टाने आजवर नपुंसक असं म्हटलं नाही. त्यामुळे या सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी, असे पवार म्हणाले.छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला. याबद्दल पवार म्हणाले की, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखवी. या घटनेचा मास्टर माईंड कोण, याचा शोध घ्यावा. दोषीवर कठोर कारवाई करावी.शिंदे-फडणवीस सरकार आता सावरकर यात्रा काढमार आहे. त्याविषयी पवार म्हणाले की, महापुरुषांबद्दल सर्वांना आदर आहे. महत्त्वाचे मुद्द्यांवरून लक्ष वळविण्यासाठी यात्रेचा प्लॅन असू शकतो. मध्यंतरी काही लोकांनी शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वक्तव्य केली. तेव्हा यात्रा निघाल्या का..? आम्ही तर तेव्हा मोर्चा काढला होता, असा टोला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी लगावला.