Home स्टोरी नटवर्य कै. राम गणेश गडकरी’ स्मृतीप्रित्यर्थ “सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा २०२४”...

नटवर्य कै. राम गणेश गडकरी’ स्मृतीप्रित्यर्थ “सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा २०२४” मध्ये ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना’च्या विद्यार्थ्यांची बाजी.

330

सिंधुदुर्ग: अष्टपैलू कलानिकेतन मालवण, आयोजित ‘नटवर्य कै. राम गणेश गडकरी’ स्मृतीप्रित्यर्थ “सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा २०२४” मध्ये ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना’च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवत बाजी मारली आहे. बालगटातून कु. कनक दीनानाथ काळोजी तर खुल्या गटातून  कौस्तुभ संतोष धुरी हे प्रथम क्रमांक च्या पारितोषिकाचे विजेते ठरले आहेत. तर खुल्या गटातूनच द्वितीय क्रमांक कु. गौरी बाबू पारकर व  सौ. मिनाक्षी कपिल मेस्त्री यांनी तृतीय क्रमांक मिळवून खुल्या गटात श्री राधाकृष्ण संगीत साधना चा ठसा उमटविला आहे.

तसेच कुमार गटातून श्री राधाकृष्ण संगीत साधनाची कु. आर्या गणेश आजगांवकर द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. सोबतच याच गटातून  कु. दिक्षा काकतकर उत्तेजनार्थ द्वितीय तर  कु. सानिका मेस्त्री उत्तेजनार्थ तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.

या शिवाय बालगटातून उत्तेजनार्थ द्वितीय कु. ज्ञानेश्वरी प्रवीण तांडेल, उत्तेजनार्थ तृतीय आराध्य खोत तर खुल्या गटातून कु. गरिमा काजरेकर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. एकुणच या संपूर्ण स्पर्धेत श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या विद्यार्थ्यांचा दबदबा दिसून आला.

या सर्व विद्यार्थ्यांना श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या संचालिका  सौ. वीणा दळवी, कोरिओग्राफर काशिनाथ मेस्त्री यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी ऑर्गन साथ विद्यालयाचाच विद्यार्थी साहिल घुबे यांनी केली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री राधाकृष्ण संगीत साधना परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन.