सावंतवाडी: नगरपरिषद ठेकेदार कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर २०२३ मासाचे मासिक वेतन १७ जानेवारी २०२४ पर्यंत बँक खात्यात जमा न झाल्याने ठेकेदार कर्मचाऱ्यांमध्ये अप्रसन्नता व्यक्त होत असून नूतन वर्षातील प्रारंभ आणि मकर संक्रांतीचा गोडवा उणावला आहे. काही दिवसापूर्वी शहर स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता दूताने मासिक वेतन व भविष्य निधी यांच्या तपावतीमुळे नगर प्रशासन व स्वच्छता दूतामध्ये संघर्ष उद्भवला त्याची प्रणेंती कचरा उचलणे बंद वर झाली होती. सध्या नगरपरिषद प्रशासनाचा प्रशासकीय भार चालवणारे नियमित कर्मचारी निवृत्त झाल्याने हा प्रशासकीय कारभार ठेकेदारीवर लीपिक, शिपाई, मजूर वाहन चालक, तारतंत्री, कडून हा करून घेतला जातो सध्या स्थितीत नगर परिषदेमध्ये ठेकेदारी वरील काम करणारे ५० आहेत. नगर परिषदेमध्ये दैनंदिन कामकाजाचा कानोसा घेतला असता कामकाजाचा लेखाजोखा सादर न केल्याने मासिक वेतन प्रशासनाने रोखण्याची चर्चा आहे, याचा परिणाम मात्र जनतेच्या कामकाजावर होतो. म्हणून सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने ठेकेदारांनी वरील लिपिक शिपाई, मजूर, वाहन चालक पदांची शासनाने मंजूर केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे कळते. त्यांचे मूल्यमापन करून एकदाचा सोक्षमोक्ष मोडावा अशी अपेक्षा येथील नागरिकांची आहे.