Home स्टोरी ध्यास फाऊंडेशनच्या वतीने गणवेश वाटप!

ध्यास फाऊंडेशनच्या वतीने गणवेश वाटप!

372

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): वराड सावरवाड येथील ध्यास फाऊंडेशनच्या वतीने सौ हि. भा. वरसकर विद्या मंदिर वराड येथे विद्यार्थ्याना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी नंदन केसरकर यांनी ध्यास फाऊंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली.ध्यास फाऊंडेशन शैक्षणिक सामाजिक व आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवणार असून त्याचाच भाग म्हणून आज गरजू गरीब व होतकरू विद्यार्थ्याना गणवेश वाटप होत आहे. मुलानी अभ्यास करून प्रगती साधावी असे आवाहन त्यानी केले.

या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक सुरेश चव्हाण, शालेय समितीचे पदाधिकारी देवेन ढोलम, केशव परुळेकर, वसंत वराडकर, मुख्याध्यापिका मयेकर मॅडम, शिक्षीका परब म्याडम, मुळीक सर, गोसावी सर, ध्यास फाऊंडेशनचे पदाधिकारीधोंडी फाटक, नंदन केसरकर, रुपेश भोगटे, कीर्तीराज चव्हाण, उपस्थित होते. मुख्याध्यापिक मयेकर मॅडम यांनी आभार मानले.