Home क्राईम धोबीघाट बांधण्यासाठी आलेला संपूर्ण निधी धोबीघाटाचे बांधकाम न करताच खर्च..!

धोबीघाट बांधण्यासाठी आलेला संपूर्ण निधी धोबीघाटाचे बांधकाम न करताच खर्च..!

294

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावात बामणादेवी वाडी येथे २०२२-२३ च्या दरम्यान धोबीघाट मंजूर करण्यात आला होता. हा धोबीघाट बांधण्यासाठी माडखोल गावातील बामणादेवी येथील रहिवासी भरत राऊळ या व्यक्तींनी स्वतःची मालकी हक्काची दोन गुंठे जागा दिली होती.  याबाबत योग्य ते कागदपत्र पूर्ण करून ग्रामपंचायतिला माहिती दिली असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर या जागेवर धोबीघाट बांधण्यास सुरुवात झाली अशीही माहिती बांधकाम खात्याला देण्यात आली. धोबी घाटाचे काम वेळोवेळी पूर्ण होत असल्याचे माहिती संबंधित बांधकाम विभागाला देऊन त्याप्रमाणे बांधकाम विभागाकडून धोबीघाटासाठी मंजूर असलेला निधी वेळोवेळी खर्च करण्यात आला. असं असतांना मात्र आज रोजी माडखोल बामणादेवी येथील भरत राऊळ यांनी स्वतःची मालकी हक्काची जागा ज्या धोबी घाटासाठी दिलेली आहे, त्या ठिकाणी कोणतही बांधकाम झालं नसल्याचा धक्कादायक  प्रकार समोर येत आहे. आज धोबी घाट बांधून पूर्ण झाला असल्याचं सांगत ठेकेदाराने सर्व निधी खर्च केला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र जाग्यावर धोबीघाट नसल्यामुळे  संपूर्ण धोबीघाटक चोरीला गेला की काय? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

“जाऊ तिथे खाऊ” या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी ज्याप्रमाणे भ्रष्टाचाराचे पाळमुळं खोदत विहीर चोरीला गेली असं दाखवलं होतं त्यांचप्रमाणे माडखोल बामणादेवी येथील भरत राऊळ यांनी धोबीघाट बांधण्यासाठी दिलेल्या जागेत धोबीघाट बांधून पूर्ण झाला. अशी माहिती प्रशासनाला देऊन धोबीघाटासाठी मंजूर असलेला निधी सर्व खर्च केला आहे. मात्र या ठिकाणी आता धोबीघाटच नसल्यामुळे धोबीघाट गेला कुठे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. अर्थातच धोबीघाट चोरीला गेला अशी चर्चा सुरू आहे.

माडखोल बामणादेवी येथील मंजूर धोबीघाटाचे बांधकाम  बांधताना ठेकेदाराने वेळोवेळी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली असेलच आणि संबंधित प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन धोबीघाटाचे बांधकाम तपासूनच ठेकेदाराला पैसे दिले असतील. हे नाकारता येणार नाही. मात्र धोबीघाट पूर्ण झालेला असून त्यासाठी मंजूर निधी खर्च झालेला असूनही ठेकेदाराने बामणादेवी येथील भरत राऊळ यांनी दिलेल्या जागेत सध्या धोबीघाट दिसत नसल्याने धोबी घाट गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. माडखोल, बामणादेवी या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे काय? असाहि प्रश्न उपस्थित होत आहे. थोडक्यात संपूर्ण धोबीघाट बांधून पूर्ण झाल्याची माहिती दिल्यामुळेच संपूर्ण निधी खर्च झालेला आहे. हे नाकारता येणार नाही. त्यामुळे हा एक भ्रष्टाचार आहे. हेही नाकारता येणार नाही.

माडखोल, बामणादेवी या ठिकाणी धोबीघाट प्रकरणात  झालेल्या भ्रष्टाचारामध्ये कोण कोण सहभागी आहेत? आणि  या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई सरकार, प्रशासन करणार की नाही? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती योग्य असेल आणि माडखोल, बामणादेवी या ठिकाणी येथील रहिवाशी भरत राऊळ यांनी धोबीघाटासाठी स्वतःच्या मालकीची दिलेली दोन गुंठे जागेत जर या धोबीघाट नसेल तर मात्र हे प्रकरण लाजिरवाणं आहे. हे नाकारता येणार नाही. याबाबत आता गावचे सरपंच,  प्रशासकीय अधिकारी आणि सुज्ञ नागरिक योग्य ती चौकशी करतील काया? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.