Home स्टोरी धुमडेवाडी गावचे सुसंस्कृत व्यक्तिमत्व श्री. तुकाराम सटूप्पा पाटील गुरूजी अनंतात विलीन! अत्यंविधी...

धुमडेवाडी गावचे सुसंस्कृत व्यक्तिमत्व श्री. तुकाराम सटूप्पा पाटील गुरूजी अनंतात विलीन! अत्यंविधी आज रात्री ८ .३० वाजता धुमेडेवाडी येथे होणार.

63

चंदगड : धुमडेवाडी ( ता. चंदगड ) गावचे प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक, माजी सभापती श्री.शांताराम सटूप्पा पाटील यांचे ज्येष्ठ बंधू, श्री. अरूण तुकाराम पाटील व उद्योजक श्री . बाळासाहेब ऊर्फ अविनाश तुकाराम पाटील यांचे पिताश्री गुरुवर्य तुकाराम सटूप्पा पाटील यांचे आज सोमवार दिनांक २० मार्च २०२३ रोजी वृध्दापकाळामुळे वयाच्या ८४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुपारी २.३० वाजता बेळगांव येथे डॉ.व्ही .एन . देसाई यांच्या दवाखान्यात दुःखद निधन झाले. तुकाराम सटूप्पा पाटील गुरुजी म्हणजे ध्येयनिष्ठ, तत्त्वनिष्ठ , दानशूर , शिक्षण प्रेमी होते. गोवा – पेडणे येथे त्यांनी ३५ वर्षे प्राथमिक अध्यापकपदी शैक्षणिक सेवा करून सेवानिवृत्त झालेले होते. आयुष्यभर त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकिय कार्याबरोबर बहुजनांचे प्रबोधन करण्याचे कार्य केले. धुमडेवाडी भागातील तुकाराम पाटील गुरूजी यांचे कुटूंब हे सुसंस्कृत कुंटूब म्हणून ओळखले जाते. बागिलगे गावचे सरपंच श्री .नरसु सटूप्पा पाटील , स्वर्गीय शिवाजी सटूप्पा पाटील , माजी सभापती श्री . शांताराम सटूप्पा पाटील, श्री. शंकर सटूप्पा पाटील हे तुकाराम गुरुजींचे सर्वच बंधू राजकिय व सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तुकाराम गुरुजी यांनी आपल्या सर्वच बंधूना व मुलांना, मुलींना, नातवंडाना चांगले संस्कार दिलेत. त्यांचे मोठे मुलगे श्री.अरूण तुकाराम पाटील हे कृषीअभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर येथून सेवानिवृत्त झालेले आहेत . तर लहान मुलगे श्री.अविनाश तुकाराम पाटील* यांनी अजिक्यंतारा ग्रुपमार्फत हलकर्णी फाटा येथे उद्योजक म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. गुरुजींच्या दोन मुली , नातवंडे , पणतवंडे, सुना असा आदर्श , संस्कारीत गोतावळा असून त्यांनी अनेक उच्चविद्याविभूषित विद्यार्थी , समाज निर्माण केला .अशा या निरलस ,निस्पृह ,सच्छिल, तुकारामाचे जाणं सर्वांच्याच मनाला चटका देणारं आहे . त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबियावर व धुमडेवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे . हा आघात सोसण्याचे सामर्थ्य परमेश्वर त्यांच्या कुटूंबियासह सर्वांना देवो. मृतात्म्यास चिरशांती व सद् गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! अंत्यविधी आज रात्री ८ .३० वाजता धुमडेवाडी येथे आहे.. श्री .आर .आय. पाटील सर , कुटुंबिय व ग्रामस्थ तांबुळवाडीमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली.