Home स्टोरी धाकोरे येथे शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन…!

धाकोरे येथे शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन…!

349

सावंतवाडी: तालुक्यातील धाकोरे येथे शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम आयोजित केला होता . सदर कार्यक्रमात फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी आंबा काजू पिक संरक्षण , यशवंत गव्हाणे यानी चिकट सापळ्यांचा प्रभावी वापराबाबर प्रात्यक्षिक दाखवले व सिंधुरत्नमधून अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या फळमाशी सापळ्यांचा वापर करावा असे आवाहन केले. BTM मिनल परब यानी जैविक शेती मिशन व गट नोंदणी बाबत मार्गदर्शन केले.

कृषी सहाय्यक प्रिया पवार मॅडम यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. यावेळी धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक, तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.