सिंधुदुर्ग: दिनांक २५ जून रोजी पुणे येथे झालेल्या द ग्रेट मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल रन चॅम्पिअनशिप मध्ये सिंधू रनर टीमने उत्तम कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले. द ग्रेट मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल रन चॅम्पिअनशिप हि ITRA (इंटरनॅशनल ट्रेल रन अससोसिएशन) कडून मान्यता प्राप्त अल्ट्रा ट्रेल रन आहे. द इंडियन स्पोर्ट रेवोल्युएशन टीम कडून आयोजित होणाऱ्या या रन मध्ये जगभरातून चॅम्पियन रनर येतात. पुण्यातील आदिनाथ नाईक आणि जयगोविंद यादव या अल्ट्रा रनरच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या रेस मध्ये या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मेघराज कोकरे, फ्रँकी गोम्स, विनायक पाटील आणि रसिक परब या धवकानी सहभाग नोंदवला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख मावळे तानाजी मालुसरे यांचे गाव कोंढापुर (कुसगाव खिंड) येथून हि रन चालू होते, पुढे कुसगाव डोंगर, आई विंझाई मंदिर ते नसरापूर डोंगर आणि परत कुसगाव खिंड असा या रन चा मार्ग आहे. उंच डोंगर, अवघड चढण, घनदाट जंगल, निसरडा अरुंद मार्ग खूप अवघड आणि त्यात रन दरम्यान पडलेला पाऊस या मुळे हि रन रनर ची क्षमता तपासणारी मनाली जाते. जागतिक पातळीवर होणाऱ्या UTMB (The Ultra-Trail du Mont-Blanc) रेस ची पात्रता रन म्हणून हि रन ओळखली जाते. या वर्षी या रेस साठी देशातून वेगवेगळ्या राज्यातील तब्बल ६०० धावक सहभागी झाले होते. सिंधू रनर टीमचे धावक २५ किलोमीटर रन विभागात सहभागी झाले होते.
पुण्याजावळील कुसगाव खिंड पासून सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी हि रेस चालू झाली. २५ किलोमीटर अंतर आणि १७०० मीटर चढण असलेली हि अवघड रन फक्त ७ तासात पूर्ण करण्याचा निर्धारित वेळ दिला गेला होता. रसिक परब हिने तब्बल ४ तासात हि रन पूर्ण करून सर्व धावकत मुली मध्ये ३ रे स्थान पटकावले, फ्रँकी गोम्स- याने ३ तासात हि रेस पूर्ण करून मुलां मध्ये ५ वे स्थान पटकावले, मेघराज कोकरे याने ३ तास आणि २ मिनिटात हि रेस पूर्ण करून मुलां मध्ये ६ वे स्थान पटकावले तर विनायक पाटील याने ३ तास आणि २4 मिनिटात हि रेस पूर्ण करून मुलां मध्ये २० वे स्थान पटकावले आणि सिंधू रनर टीम चे नाव विजयी धावकांच्या यादीत कोरले. रन मध्ये येणारे चड उतार, निसरडी पायवाट, उंच उंच डोंगर कडे आणि यातून पण स्वतःचे पाणी आणि खाद्य साहित्य घेऊन पळणे या सगळ्या अडचणींवर मत करून टीमने अव्वल स्थान पटकावले आणि उपस्थित सगळ्या रनिंग टीमचे लक्ष्य वेधले.
वरील कामगिरीबद्दल या सर्व टीम मेंबर्स चे कौतुक होत आहे. रेस डायरेक्टर आदिनाथ नाईक आणि जयगोविंद यादव, सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोसले, डॉ शंतनू तेंडुलकर, डॉ स्नेहल गोवेकर, डॉक्टर्स अससोसिएशन ऑफ सावंतवाडी तसेच सावंतवाडी रिक्षा चालक मालक संघटना, दैनिक कोकण साद, सर्व पत्रकार बंधू आणि डॉ बाबासाहेब पाटील (आयुर्वेद महाविद्या सावंतवाडी चे प्राचार्य), सौ शिल्पा खोत (युवती सेना प्रमुख मालवण) अश्या सर्व मान्यवरांकडून सिंधू रनर टीमचे कौतुक होत आहे. अशीच कामगिरी सिंधू रनर टीम बजावत राहील यात किंचित मात्रहि शंका नाही. सिंधुदुर्गात नवनवीन धावकतयार होऊन त्यांना नवीन व्यासपीठ मिळावे यासाठी सिंधू रनर टीम प्रयत्न करत आहे.