Home स्टोरी ‘द केरल स्टोरी’ला विरोध करणे चुकीचे! अभिनेत्री शबाना आझमी

‘द केरल स्टोरी’ला विरोध करणे चुकीचे! अभिनेत्री शबाना आझमी

105

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: नुकताच प्रदर्शित झालेला ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्वीट करून व्यक्त केले. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘अभिनेते आमिर खान यांच्या लाल सिंह चड्डा या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ज्याप्रमाणे चुकीची आहे, त्याचप्रमाणे ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटावरही बंदी घालण्याची मागणीही चुकीची आहे.एकदा चित्रपटाला केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे (‘सेन्सॉर बोर्डा’चे) प्रमाणपत्र मिळाले, की अन्य कुठल्याही घटनात्मक संस्थांची त्यात भूमिका नसते.’ अभिनेते आमिर खान यांनी यापूर्वी हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारा ‘पीके’ हा चित्रपट केला होता. त्यावरून ‘लाल सिंह चड्डा चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.