सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणार्या याचिकेवर त्वरित सुनावणी करणे योग्य होणार नाही. ‘चित्रपटाच्या प्रसारणाच्या आधीच त्याला आव्हान देणे अयोग्य आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केरळच्या सत्ताधारी साम्यवादी सरकारने ही याचिका ‘हा चित्रपट द्वेषाला प्रोत्साहन देतो’, असा आरोप करत प्रविष्ट केली होती. ‘केरळमध्ये लव्ह जिहादच्या षड्यंत्राच्या अंतर्गत ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना इस्लामिक स्टेटमध्ये पाठवण्यात आले’, या वास्तवावर आधारित हा चित्रपट ५ मे या दिवशी प्रदर्शित होणार आहे.