Home स्टोरी दोषी बलवंत सिंग राजोआना याची मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

दोषी बलवंत सिंग राजोआना याची मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

90

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची वर्ष १९९५ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातील दोषी बलवंत सिंग राजोआना याला ठोठावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्याची मागणी त्याने याचिकेत केली होती.२६ वर्षांच्या दीर्घ कारावासाच्या आधारे राजोआना याने फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी २ मे या दिवशी केंद्र सरकारला राजोआना याने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर दोन मासांत निर्णय घेण्यास सांगितले होते; मात्र केंद्राकडून कोणताही निर्णय न आल्याने गेल्या वर्षी २८ सप्टेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण स्वत:कडे घेतले होते. जुलै २००७ मध्ये विशेष न्यायालयाने बलवंत सिंग राजोआना याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.