Home राजकारण दोन मंत्र्यांच्या शीतयुद्धात स्थानिक डीएड धारक नोकरी पासून वंचित राहू नये! योगेश...

दोन मंत्र्यांच्या शीतयुद्धात स्थानिक डीएड धारक नोकरी पासून वंचित राहू नये! योगेश धुरी

156

सिंधुदुर्ग: शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणतात स्थानिकांशिवाय भरती करणारच, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात की आहेत कोण शिक्षणमंत्री? या दोन मंत्र्यांच्या शीतयुद्धात स्थानिक डीएड धारक नोकरी पासून वंचित राहू नये हीच ईश्वरी चरणी प्रार्थना,या विषयात राजकारण आणि वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून त्या डिएड धारकांना न्याय मिळाला पाहिजे. असं युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी म्हटलं आहे.

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी

डीएड बेरोजगार तरुणांचा आवाज सर्वप्रथम युवासेनेने उठवला आणि संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन नेले. गुन्हे देखील दाखल झाले आणि नंतर ह्या आंदोलनाला खरी दिशा मिळाली. या आंदोलनला शिक्षणमंत्री यांनी भेट दिली आणि सरळच सांगितलं की स्थानिकांना प्राधान्य देता येणार नाही. अस त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायणराव राणेनी भेट दिली. त्यांनी तर चक्क कोण शिक्षणमंत्री? म्हणत शिक्षणमंत्री यांची काढुनच टाकली. राणेंच्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलकांनी आंदोलन स्थगीत केले. पण त्यांना नोकरी मिळणार का? हा यक्ष प्रश्न आहे. कारण दोन मंत्र्यांच्या शीतयुध्दात त्यांना न्याय मिळणार का? हा प्रश्नच आहे. स्थानिकांव्यतिरिक्त उमेदवार भरल्यास युवासेना मात्र गप्प बसणार नाही आणि परजिल्ह्यातील उमेदवार यांना येऊच देणार नाही. शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कायम स्थानिक डिएड उमेदवार यांच्या सोबत आहे आणि राहणार. तसेच यापुढे जिल्ह्यात सरळ स्थानिक भरतीत जिल्ह्यातील भूमिपुत्रांची भरती झाली पाहिजे. यासाठी युवासेना आग्रही राहील आणि प्रसंगी रस्त्यावर पण उतरेल. असंहि युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी म्हटलं आहे.