२१ सप्टेंबर वार्ता: देवगड तालुक्यातील मुणगे येथील रस्त्यावर सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी मिठबाव येथील प्रसाद लोके या युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह रस्त्याच्या मधोमध उलटा पडलेल्या स्थितीत आढळून आला होता. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. असे असतांना आज गुरवार दि.२१ सप्टेंबर रोजी पहाटे मृत प्रसाद लोके यांची पत्नी अंकिता प्रसाद लोके हिने गळफास लावून आत्महत्या केल्याने मुणगे येथील परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत देवगड पोलिसांनी कळविण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अंकिता प्रसाद लोके ही मिठवाब येथील आपल्या घरी आईसोबत गुरुवारी रात्री झोपली होती. पहाटे तिच्या आईला जाग आली तेव्हा अंकिता लोके तिच्या बाजूला नसल्याचे लक्षात येताच तिने घरातील सर्वाना सांगितले. घरात सर्वत्र शोधाशोध केली असता टेरेस वर शेडच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत अंकिता लोके आढळून आली.