Home क्राईम दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्याचा केला खून!

दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्याचा केला खून!

283

१२ जून वार्ता: ठाणे जिल्ह्यात वर्चस्ववादातून दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये वाद झाला. या वादात एकाने दुसऱ्याचा चाकूने वार करुन खून केला आहे. अमोल लोखंडे (वय ३९) असे हत्या झालेल्या गुडांचे नाव आहे. तर टक्या उर्फ जयेश डोईफोडे ( वय ३२) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. टक्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ही घटना कल्याण पूर्वेतील समता नगर भागात असलेल्या नवीन दुर्गामाता मंदिर रोडवर घडली आहे. अमोल लोखंडे आणि टक्या उर्फ जयेश यांच्यामध्ये वर्चस्ववादातून भांडण होते. त्यामुळे या दोघांमध्ये कायमच वितुष्ठ असायचे. त्यातच यातील टक्या उर्फ जयेश डोईफोडे याने अमोल लोखंडे याची कल्याण पूर्वेतील समता नगर भागात असलेल्या नवीन दुर्गामाता मंदिर रोडवर सपासप वार करुन हत्या केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर टक्या उर्फ जयेश डोईफोडे ( वय ३२) या कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केले आहे.