दोडामार्ग प्रतिनिधी: एप्रिल महिन्यात दोडामार्ग तालुक्यातील सटेली भेडशी येथे गेली ५० वर्षाहून अधिक काळ राहत असलेल्या मुस्लीम कुटुंबातील अस्लम खेडेकर यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ५ में २०२५ रोजी त्यांचं संपूर्ण घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आलं. असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोणतीही कायदेशीर नोटीस नाही. पूर्व सुनावणी नाही. केवळ “ऑर्डरवर कारवाई” म्हणत प्रशासनाने घर पाडलं. हा प्रकार संविधानाच्या अनुच्छेद १४ व २१ नुसार प्रत्येक नागरिकाला समान वागणूक व न्यायाची हमी आहे. त्या अनुच्छेद १४ व २१ चा स्पष्ट उल्लंघन झालं आहे. कोणतीही नोटीस न देता, किंवा न्यायालयीन प्रक्रिया न पार पाडता घरावर बुलडोझर चालवणे म्हणजे कायद्याला बगल देणे आहे. जेव्हा एखाद्याचे मूलभूत अधिकार हिरावले जातात, तेव्हा ते संपूर्ण समाजासाठी धोका असतो. आणि अशीच घटना दोडामार्ग तालुक्यातील सटेली भेडशी येथे घडली आहे. असा गैरप्रकार होऊन हि या मुस्लिम कुटुंबांच्या मदतीला कोणती सामाजिक संस्था, संघटना, मानव अधिकार संघटना, प्रशासकीय अधिकारी मदतीला आले नसल्याचे दिसून येत आहे. तसेच येथील रहिवासी अश्फाक नदाफ याची तीन गुंठे जमीन बळजबरीने ग्रामपंचायतीच्या नावे करून घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच काही योग्य आणि ठोस कारण नसताना ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन मुस्लिम कुटुंबांची उदरनिर्वांची साधने अर्थात व्यवसाय धंदे दोन महिने बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दुकाने व्यवसाय बंद ठेवण्याचा अधिकार ग्रामपंचायतला नाही. तरीसुद्धा असं घडल्याने नेमकं घडतंय तरी काय? मनमर्जी व्यवहार होत आहेत काय? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ मुस्लिम नदाफ कुटुंब आणि खडेकर कुटुंब दोडामार्ग तालुक्यातील सटेली भेडशी येथे वास्तव्यास आहे. उदरनिर्वासाठी हे कुटुंब चिकन सेंटर, भाजीचे दुकान, टायर पंचर दुकान आणि JCB चा व्यवसाय करत आहेत. याच व्यवसायातून या मुस्लिम कुटुंबीयांनी गावात चांगली प्रगती केली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी याच कुटुंबातील अश्फाक नदाफ याने आपल्याच घराच्या बाजूला मित्रपरिवाराकडे मालकी हक्काची ७४ असलेल्या एका सामायिक जमिनीतील १५ गुंठे जमीन विकत घेतली. नंतर त्याच गावातील काही ठराविक व्यक्ती आपल्या घराकडे जाण्यासाठी अश्फाक नदाफ याने आणि त्याच्या काही मित्रांनी घेतलेल्या जमिनीतून रस्त्याची मागणी करू लागले. मात्र अश्फाक नदाफ याने विनंती करुन सांगितलं कि रस्ता आमच्या जमिनीतून देऊ शकत नाही. कारण जमीन ही खूप महाग आहे आणि रस्तांसाठी तीन ते चार गुंठे जमीन देणे मला परवडणार नाही. याचाच राग धरून विरोधकांनी अश्फाक नदाफ आणि त्याच्या मित्र परिवाराला त्रास द्यायला सुरुवात केली. कित्येक वेळा ग्रामपंचायत मध्ये हिंदू मुस्लिम दंगे होणार, हे मुस्लिम आपल्या गावात काहीतरी चुकीचं करणार असे असे पत्र व्यवहार होऊ लागले. मुस्लिम कुटुंबना दमदाटी करून जमिनीची मागणी करू लागले. परंतु या मुस्लिम कुटुंबियांनी विरोधकांना जमीन दिली नाही.
त्यानंतर २७ एप्रिल २०२५ रोजी ह्या मुस्लिम कुटुंबीयांपैकी एका घरात तलवारी आणि घातक हत्यारे असल्याची माहिती या विरोधकांनी काही लोकांना दिली आणि लोकांना भडकवून या मुस्लिम कुटुंबीयांच्या घराकडे घेऊन गेले. त्यानंतर दुपारी एक ते चार वाजेपर्यंत त्या घराची तेथे जमलेल्या लोकांनी तपासणी केली. मात्र त्या दरम्यान एकही घातक हत्यार त्या घरात सापडलं नाही. त्यानंतर त्या घरात राहत असलेले पोलीस मौलाना यांना दोडामार्ग पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी ७ वाजता पोलीस आणि काही व्यक्ती त्या घरात जवळ आले आणि त्या घराचे मालक खेडकर यांना त्या घराजवळ घेऊन गेले आणि पुन्हा तपास सुरू केला. मात्र पुन्हा तपास सुरू केला असता लगेच किचनमध्ये लाल कपड्यात गुंडाळलेल्या दोन तलवारी सापडल्या. आता दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत अनेक लोकांनी शोध मोहीम सुरू केली असताना काही हत्यार सापडलं नाही. मात्र अचानक संध्याकाळी सात वाजता त्याच घरात तपास केला असता १५ ते २० मिनिटात तलवारी सापडल्या व घराचे मालक खेडकर यांना पोलीस दोडामार्ग पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आता दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत अनेक लोकांनी शोध मोहीम सुरू केली असतांना काही हत्यार सापडलं नाही. मात्र अचानक संध्याकाळी सात वाजता त्याच घरात तपास केला असता १५ ते २० मिनिटात तलवारी कश्या सापडल्या? तसेच या तलवारी कोणी आणून ठेवल्या? त्या घरात खरंच तलवारी होत्या तर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान ज्यावेळी अनेक लोकांनी त्या तलवारी शोधल्या तेव्हा त्या तलवारी कशा नाही सापडल्या?असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
तलवारी सापडल्यानंतर मुस्लिम कुटुंबीयातील अस्लम इस्माईल खेडेकर, वय-४४ वर्षे, बिलाल आलम शेख, वय-३८ वर्षे, आशपाक अल्लाबक्ष नदाफ, वय-३५ वर्ष, अब्दुलकादर रफीक बिडीकर, वय-३७ वर्षे, आशपाक सदरुद्दीन नेसरीकर, वय-५० वर्षे, इसाक इस्माईल खेडेकर, वय-५६ वर्षे, अलताफ इस्माईल येलगुद्री, वय-४४ वर्षे, मुस्तफा म्हाबुबसुभानी सय्यद, वय-७० वर्षे सर्व रा. साटेली-भेडशी ता. दोडामार्ग अशा आठ व्यक्तींना दोडामार्ग पोलीस स्टेशनला नेण्यात आले व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना सावंतवाडी कोर्टात हजर करून जामीनावर मुक्त करण्यात आले. त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे व्यक्ती या मुस्लिम कुटुंबातील अश्फाक नदाफ याच्याकडे रस्त्यासाठी जमीन मागत होते त्या व्यक्तींनी ३ दिवसानंतर लगेच ३० एप्रिल २०२५ रोजी त्याच्याकडून ३ गुंठे जमीन ग्रामपंचायतच्या नावे करून घेतली. ह्या तीन गुंठे जमिनीची किंमत फक्त १ रुपया ठरवण्यात आली.
एकंदरीत सर्व प्रकरण विचारात घेता २७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ७:२० वाजता मुस्लिम व्यक्तींच्या घरात सापडलेल्या तलवारी आणि त्यानंतर लगेच ३० एप्रिल २०२५ फक्त १ रुपया देऊन जमीन नावावर करून घेणे. याचा विचार करता २७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ७:२० वाजता रोजी घरात मिळालेल्या तलवारी जमीन मिळवण्यासाठी ठेवल्या होत्या काय? जमिनीसाठी हे शहर षडयंत्र रचण्यात आलं होतं? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि त्यानंतर काही दिवसांनी कोणतीही नोटीस न देता, किंवा न्यायालयीन प्रक्रिया न पार पाडता खेडकर यांचे घर बुलडोझरने पडण्यात आले. मुस्लिम कुटुंबावर झालेला हा मोठा अन्याय आहे आणि या अन्यायाविरोधात लवकरच पिडीत मुस्लिम व्यक्ती न्यायालयात, प्रशासनाकडे आणि सरकारकडे दाद मागणार आहे. संबंधित कुटुंबाला त्वरित न्याय व नुकसानभरपाई मिळावी म्हणून आमरण उपोषण करणार असल्याचे माहिती पिडीत कुटूंबातील व्यक्तींनी दिली आहे. Supreme Court ने यापूर्वीच असा कोणताही विध्वंस करण्या आधी कमीत कमी १५ दिवस नोटीस देणे, आणि due process पालन करणे आवश्यक आहे असे स्पष्ट निर्देश जारी केले; मात्र, हे आताही अमलात आले नाही. जेव्हा एखाद्याचे मूलभूत अधिकार हिरावले जातात, तेव्हा ते संपूर्ण समाजासाठी घातक असतात. हे या प्रकरणातून समजून घेणे गरजेचे आहे.
या प्रकरणात मुस्लिम कुटुंबीयांच्या विरोधात जो व्यक्ती आहे आणि गेली कित्येक महिने मुस्लिम कुटुंबीयांना दमदाटी करत आहे तो व्यक्ती आपण एका हिंदू संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगत आहे. दमदाटी करणारा व्यक्ती आपण या गावातून मुस्लिमांना हाकलून लावणार आहोत. मुस्लिमाना या गावात ठेवायचं नाही. अशा प्रकारची वार्ता करत आहे. त्यामुळे हा व्यक्ती खरंच एका हिंदू संघटनेचा कार्यकर्ता असेल तर असा व्यक्ती हिंदू धर्मासाठी आणि इतर लोकांसाठी घातक स्वरूपाचा आहे. तसेच या व्यक्तीमुळे गावात हिंदू मुस्लिम वाद होऊन हाणामाऱ्या होऊ शकतात व कुणाचा तरी बळी जाऊ शकतो. असं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीची हिंदू संघटनेने योग्य ती दखल घ्यावी. अशी मागणी पिडीत मुस्लिम कुटुंब हिंदू संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे करणार आहे.
पिडीत कुटूंबातील व्यक्तींच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
१. पीडित कुटुंबास त्वरित न्याय व नुकसानभरपाई मिळावी.
२. जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
३. भविष्यात कोणत्याही धर्म, जाती वा आर्थिक स्तराच्या व्यक्तींवर असा अन्याय होऊ नये यासाठी स्थायी मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात यावीत.
४. तलवारी नेमक्या कोणी ठेवल्या? याची अजून योग्य तो तपास झालेला नाही. त्यामुळे योग्य तो तपास व्हावा. तलवारी ठेवणाऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.