Home स्टोरी दोडामार्ग येथील बोडदे गावठाणवाडी केळीचे टेंब पुलाचे अर्धवट काम पूर्ण न झाल्यास...

दोडामार्ग येथील बोडदे गावठाणवाडी केळीचे टेंब पुलाचे अर्धवट काम पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

257

दोडामार्ग प्रतिनिधी: दोडामार्ग येथील बोडदे गावठाणवाडी केळीचे टेंब या ठिकाणी शेळीच्या भागातून ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी ओहोळाला ब्रिज कम पूल मंजूर करण्यात आले आहे. सदर पुलाचे काम मार्च महिन्यात सुरू करण्यात आले. पण अचानक गेल्याच पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे सदरच्या पुलाचे काम अर्धवट स्थितीत राहिले आहे. त्यामुळे या भागात चिखलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी स्थिती राहिल्यास येत्या पावसाळ्यात हा भाग पूर्णपणे खराब होणार आहे आणि  ये जा करणे मुश्किलीचे होणार आहे. तरी अर्धवट स्थितीत राहिलेले काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

येत्या आठ दिवसात या भागातील अर्धवट स्थितीत राहिलेले हे काम पूर्ण न केल्यास ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे. ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे याबाबत कैफियत मानण्यात आली आहे. सरपंच हरिश्चंद्र नाईक यांनी आपण लक्ष घालत असल्याचेही स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायत सदस्य महादेव गवस, सामाजिक कार्यकर्ते शंकर परब, गणपत गवस, रमेश गवस आदींनी सदरचे पुलाचे काम ठेकेदाराने त्वरित हाती घ्यावे. अशी जोरदार मागणी केली आहे. अर्धवट स्थितीत हे काम राहिल्यामुळे भागातून ये जा करणे जिकरीचे झाले आहे. तरी त्वरित काम हाती घेऊन मार्ग खुला करावा. अशी जोरदार मागणी केली आहे.